Sunday, September 27, 2009
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
Friday, August 14, 2009
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा..
Sunday, July 5, 2009
पहाट
''फिटे अंधाराचे झाले मोकळे आकाश,दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश....''दूर क्षितिजावर केशरी आणि पिवळ्या रंगांची उधळण होत होती।'मी येतोय'अशी साक्ष देत सूर्य येत होता।हळूहळू पक्षी घरट्याबाहेर पडून किलबिलू लागले होते.रात्री सर्वत्र अंधाराने अधिराज्य मिळवलेले असताना त्याची जागा आता सोनेरी किरणांनी घेतली होती.सारे आकाश स्वच्छ प्रकाशाने न्हाले होते.राना-वनात दवरूपी मोती चमकत होते.आता हळूहळू पाय्वतांना पाउलांची चाहूल लागत होती.दूर डोंगरामागून शत्पाव्लांची उधळण करत सूर्य येत होता.या प्रकाशात नद्या-नाले चमकत होते.झाडे,पाने,फुले,वेली,पक्षी...सारी सृष्टीच तिमिरातून तेजाकडे निघाली होती.भूतकाळ विसरून आम्ही त्या प्रकाशदेव्तेचे स्वागत केले होते.अशा प्रकारे काळोखी रात्र लयाला जाऊन नवीन पहाट उदयास आली होती.
Friday, July 3, 2009
Monday, June 29, 2009
त्या फुलांच्या गंधकोशी, सांग तू आहेस का?
त्या प्रकाशि तार्कांच्या,ओतिसि तु तेज का?
त्या नभाच्या नीलरंगी होवूनी आहेस का?
गात वायूच्या स्वरानी ,सांग तू आहेस का?
मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का?
मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का?
वाद्लाच्या सागराचे घोर ते तू रूप का?
जीवनी या वर्शनारा तू कृपेचा मेघ का?
आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का?
जीवनी संजीवनी तू ,माउलीचे दूध का?
जीवनी संजीवनी तू ,माउलीचे दूध का?
कश्तानार्या बांधवांच्या रंग्सी नेत्रात का?
मूर्त तू मानव्य का रे,बालकांचे हास्य का?
या इथे अन त्या तिथे रे सांग तू आहेस का?
Saturday, May 30, 2009
Subscribe to:
Posts (Atom)