मला मराठी साहित्य,संगीत,भक्तिगीते...ची फार आवड आहे.मलाही वाचनाचा छंद आहे.प्रत्येकाने एकतरी छंद नक्की जोपासावा.पु.ल.देशपांडे म्हणतात कि,''पोटापाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या.पण साहित्य,शिल्पा,संगीत किंवा एखाद्या खेळाशी मैत्री जमवा.लौकिक शिक्षण तुम्हाला जागवेल तर कलेशी होणारी मैत्री तुम्हाला का जगाव हे सांगून जाईल..''
श्वासानो,जा वायूसंगे ओलांडूनी भिंत अन आईला कळवा अमुच्या र्हुदयातील खंत सांगा वेडी तुझी मुले हि या अंधारात बद्ध कारणी अखेरचा तुज करिती प्रणिपात तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परी अनिवार त्यांना वेड परी अनिवार गरजा जयजयकार क्रांतीचा....