
त्या फुलांच्या गंधकोशी, सांग तू आहेस का?
त्या प्रकाशि तार्कांच्या,ओतिसि तु तेज का?
त्या नभाच्या नीलरंगी होवूनी आहेस का?
गात वायूच्या स्वरानी ,सांग तू आहेस का?
मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का?
मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का?
वाद्लाच्या सागराचे घोर ते तू रूप का?
जीवनी या वर्शनारा तू कृपेचा मेघ का?
आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का?
जीवनी संजीवनी तू ,माउलीचे दूध का?
जीवनी संजीवनी तू ,माउलीचे दूध का?
कश्तानार्या बांधवांच्या रंग्सी नेत्रात का?
मूर्त तू मानव्य का रे,बालकांचे हास्य का?
या इथे अन त्या तिथे रे सांग तू आहेस का?